Type Here to Get Search Results !

*मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज 100% चांदवड बंद*


 *चांदवड :* मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगे सोयरे यांची अधिसूचना अंतिम करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सगे सोयरे यांच्या वैधता प्रमाणपत्र व धरण्यात येईल याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मात्र प्रत्यक्षात सदर अध्यादेश अंतिम होत नाही तोपर्यंत कोणत्याही मराठा समाजाला याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे महाराष्ट्र शासन सदर अध्यादेश अंतिम करणे करता वेळकाढूपणा करीत असल्याने त्याचप्रमाणे उपोषणार्थी मनोज जरांगे पाटील यांची आज पाचव्या दिवशी तब्येत खालावलेली असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज दिनांक 14 फेबुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यात चांदवड तालुका सकल मराठा समाज बंद मध्ये सहभागी झालेला असून आज चांदवड बंदची हाक देण्यात आली संपूर्ण चांदवड शहर शंभर टक्के बंद मध्ये सहभागी झालेला आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच चांदवड पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात येऊन 26 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेली अधीसूचना अंतिम करून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी व विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन सदर अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे शिरीष भाऊ कोतवाल, बाळासाहेब गाढे , कैलास कोतवाल ,कारभारी आहेर , सुनिलआण्णा सोनवणे, दीपक हांडगे , धनंजय पाटील, पप्पू शिदे , सुरज भोसले, पंकज राऊत, बापु आहेर,जोजो कोतवाल, निलेश काळे,मुकेश कोतवाल ,निलेश ढगे, सचिन जाधव, डॉक्टर राजेंद्र दवंडे, रोहित शिंदे, सागर जाधव, विजय काटे , अमोल थोरे, गणेश ठाकरे यांचे सह सकल मराठा समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments