Type Here to Get Search Results !

चांदवड येथील एस एन जे बी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सोनल बागुल याची महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत निवड.

चांदवड: येथील नॅक मानांकित ‘ अ + ’ दर्जाचे  श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी  जैन अभियांत्रिकी महाविद्यालयचा अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचा  विद्यार्थी सोनल तुळशिराम बागुल यास महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत नाशिक जिल्ह्यात संस्था स्तरावरील सादरीकरणातून निवड झालेल्या उमेदवारांचे दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी जिल्हास्तरीय सादरीकरण संपन्न झाले होते. सदर जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम नवसंकल्पना असलेल्या विजेत्या 10 उमेदवारांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मा. पालकमंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांचे हस्ते पारितोषिक- रु. एक लाख धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या उमेदवारांना एक वर्षासाठी स्टार्टअप मेंटाॅरशिप प्रदान करण्यात येऊन त्यांची  राज्यस्तरावरील सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. 

उपरोक्त कार्यक्रमास मा. श्री. राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त नाशिक, मा. श्रीमती अशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक,  उपस्थित होते.

  बागूल यास विभागप्रमुख डॉ. आर. के. अग्रवाल, प्रा. प्रद्युम्न बोरा यांचे मार्गदर्शन लाभले. 
      या यशाबद्दल संस्थेच्या  विश्वस्त समितीचे अध्यक्ष  बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक  दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी  जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष  अरविंदकुमार भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व  सुनीलकुमार चोपडा आदींसह  सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य, प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, आदींनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments