Type Here to Get Search Results !

चांदवडला दीक्षा महोत्सवानिमित्त शहरातून भव्य मिरवणुक संपन्न


 चांदवड  -     चांदवड तालुक्यातील पहिली दिक्षार्थी म्हणून  चांदवड येथील जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाशचंद आबड यांची नात व शितलकुमार  आबड यांची कन्या  दिव्या शितल आबड हिचा जैन भागवती   दिक्षा महोत्सवानिमित्त  शहरातून मिरवणुक रविवार दि. 7 जानेवारी रोजी संपन्न  झाली.      भव्य  वरघोडा मिरवणुक श्री.दिंगबर  जैन मंदिर वरचेगाव येथून  निघाली सजवलेल्या रथातून दिक्षार्थी दिव्या हिला बसविण्यात आले. ठिक¨ठकाणी दिव्याचे औक्षण व स्वागत महिला भगिनीनी केले जैन महिला बरोबरच इतर समाजानेही  मिरवणुकीत  स्वागत केले. तर  शिवाजी चौक व आबड परिवाराच्या घराजवळ  भाविकांना  पिण्याचे पाणी , आईसक्रीम देण्यात आले.    तीन दिवस  या महोत्सवानिमित्त कार्यक्रम झाले त्यात  मंगल साथ , महिला मंडळातर्फे  नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम   नाटीका व वरघोडा व भती सांझी असे कार्यक्रम संपन्न झाले. मिरवणुकीचा समारोप  चंद्रभागा लॉन्स येथे झाला तेथे  बहुमान समारोह, महाप्रसाद, माहेरा, भक्ती संध्या, बिदाई आदि कार्यक्रम झाले. तर  चांदवडकरांचा कार्यक्र मानंतर  दि. 20 जानेवारी ते दि.24 जानेवारी   रोजी  रत्नावेल  कल्याण मंडपम पाच रोड सेलमनगरी  ( तामीलनाडू)   येथे  कार्यक्र म होईल अशी माहिती आबड परिवाराने दिली.दरम्यान दिव्या हिचे आजोबा प्रकाश चंद्र आबड यांनी सांगीतले  दिव्या ही शाळेत असल्यापासून तिला दिक्षा घेण्याचा विचार तिच्या मनात होता.त्यानंतर तीने जैन धर्मातील अनेक साध्वीच्या संपर्कात राहुन त्यांच्याकडून याबाबत बरेच शिक्षण घेतले होते. तर ती या विचारावर ठाम असल्याने हे शक्य झाले असे त्यांनी सांगीतले. यावेळी चांदवड शहरातील जैन समाजबांधवाबरोबर इतर समाजबांधवही उपस्थित होते.  
------------------------------------------------

Post a Comment

0 Comments