जनता विद्यालय वडाळीभोई
येथे शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न
वडाळीभोई -मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय वडाळीभोई येथे इयत्ता९वी १० वी च्या विदयार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांची प्रथम सत्रातील प्रगती,माध्यमिक शालान्त परीक्षेच्या दृष्टीने वाटचाल,पालकांची भूमिका ,शिक्षकांची भूमिका या सर्व मुद्द्यांवर आधारीत चर्चात्मक स्वरूपात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुखदेवराव जाधव होते. समवेत उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती आहेर,अभिनव बाल विकास मंदिर चे शालेय समितीचे अध्यक्ष सीताराम जाधव,जेष्ठ नागरिक पुंजाराम जाधव,नवनाथ जाधव (माजी सरपंच),विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद ठोंबरे,उपमुख्याध्यापिका मीना जाधव ,पर्यवेक्षक जिभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.शालेय गीतमंच व संगीत शिक्षिका अर्चना जाबरस यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक जिभाऊ शिंदे यांनी केले.त्यातून त्यांनी पालक मेळावा आयोजनाचा हेतू ,पार्श्वभूमी याबद्दल माहिती दिली.शिक्षक मनोगतातून दुलाजी शिंदे यांनी विद्यालयाच्या विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांची व त्यांच्या यशस्वी वाटचालीविषयी माहिती दिली.प्रसंगी पालकांनी देखील सहविचार सभेत प्रत्यक्ष सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या.याप्रसंगी विद्यार्थी प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक दोघांची भूमिका महत्त्वाची आहे असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक ठोंबरे सर यांनी मांडले.तणावमुक्त ,कॉपी मुक्त परीक्षा यादृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात सुखदेवराव जाधव यांनी सांगितले की, व्यावसायिक शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे माध्यमिक शालान्त परीक्षा असते.त्यादृष्टीने विद्यार्थी केंद्र मानून शिक्षक व पालक दोघांनी परस्पर समन्वयाने विद्यार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शन केले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुलाजी शिंदे यांनी व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मीना जाधव यांनी मानले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले
.
Post a Comment
0 Comments