चांदवडः सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्राम विकास संस्था चांदवड संचालित महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड, व्ही एन कोतवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदवड, प्राथमिक शाळा जाधव वस्ती चांदवड आणि प्राथमिक शाळा गुरुकुल कॉलनी चांदवड या विद्यालयाच्या प्रांगणात आजचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ मीनाताई कोतवाल या होत्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव वस्ती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील एस एन व होळकर विद्यालयाच्या शिक्षिका श्रीम पवार एम जी यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे ध्वजपूजन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राहुल दादा कोतवाल, होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री ज्ञानेश्वर ठाकरे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले, तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा डॉ. मा.श्री कोटमे सर, मा. श्री. पालकर सर, मा. श्री. राजुशेठ बिरार यांनी केले तर ध्वजारोहण चांदवड शहराचे प्रथम नागरिक व नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री वैभव बागुल यांनी केले. स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजपूजन माननीय सौ जयश्री प्रजापत माननीय श्री गुंजाळ माननीय श्री प्रसाद प्रजापत यांनी केले तर ध्वजारोहण माननीय श्री लोढा सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळेतील बालवाडी गट, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. मिठाईवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या मार्गदर्शिका माननीय सौ. मीनाताई कोतवाल, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राहुल दादा कोतवाल यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी होळकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर ठाकरे, श्री जाधव के. टी. श्री देशमुख टी आर श्रीम. निकम एस. पी. श्री गांगुर्डे एम. आर. श्री ठाकरे ए. के. श्री ठाकरे एम. एस. श्री गुंजाळ यु. एफ.श्रीम.पाळेकर मॅडम श्रीम. पवार एम.जी. श्री. शिंदे एच. डी. श्री. जाधव डी. डी. श्री कोतवाल वाय. बी. श्री देवरे एस. पीप्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पाटील एस. एन. मुख्याध्यापिका श्रीम शिरसाठ एच. सी. श्रीम शेवाळे एस. एच. श्रीम पाटील एस. सी. गावित बी. व्ही. श्री विधाते पी. एन. श्री. आहिरे एस. एस. उच्च माध्यमिक विभागाचे श्री निकम व्ही. आर. श्री. शिंदे जे. एस. श्री जाधव व्ही. बी. श्रीम जाधव एच. पी. श्रीम देशमाने पी. बी. श्री. कऱ्हे एस. आर. श्री कापडणीस एस. एन. श्री. जाधव डी आर. श्री गांगुर्डे के. जे. श्रीम रामवंशी एस. बी. श्रीम वाकचौरे व्ही. एस. श्री. शिंदे डी. एच. श्री. वाय. आर श्री बनकर सर. आदींनी श्रम घेतले.
Post a Comment
0 Comments