चांदवडः श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय चांदवड येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चांदवड तालुका संचालक सयाजीराव गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे पर्यवेक्षक महाले बी. आर.उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष खंडेराव आहेर, शालेय समितीचे अध्यक्ष सुभाष कोतवाल, विजय कोतवाल, डॉ. भालचंद्र पवार, डॉ.सतिष गांगुर्डे, उत्तमराव पवार, अशोक व्यवहारे सेवानिवृत्त शिक्षिका रौंदळ मॅडम, सादडे मॅडम कोतवाल सर,पगार सर, तांदळे साहेब, वाळुंज साहेब, अशोकराव हांडगे, सुरेश देशमुख, नानाजी पानसरे अभिनवचे मुख्याध्यापक जमदडे सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य लोहकरे सर यांनी केले. मविप्र संचालक सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण प्रकाश शेळके यांनी केले. विद्यालयाच्या गीतमंचाने राष्ट्रगीत ध्वजगीत, राज्य गीत, स्काऊट गाईड प्रार्थना व ध्वजगीताचे गायन केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी संगीत कवायत , संचलन ,राष्ट्रभक्तीपर, समूहगीत व वैयक्तिक गीते सादर केली. खासदार निधीतून मिळालेल्या पोडियमचे उद्घाटन खंडेराव आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अर्जुन ठाकरे यांनी असाक्षर मुक्त गावाची शपथ उपस्थित विद्यार्थी, पालक व मान्यवर यांना दिली. तसेच वनविभागाचे अधिकारी अण्णा लोखंडे व सुनील महाले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नितीन ठाकरे यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य शिक्षक, पालक ,शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments