Type Here to Get Search Results !

चांदवडच्या विकासासाठी कटिबद्ध राहू; नगराध्यक्ष वैभव बागुल यांनी स्वीकारला पदभार......... आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांचाही गौरव

सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी :चांदवड  
चांदवड : नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नूतन नगराध्यक्ष वैभव बागुल यांनी पदभार स्वीकारून शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला.​कार्यक्रमाची सुरुवात नगरपरिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष दालनात वैभव बागुल यांनी विधिवत पदभार स्वीकारला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचाही आमदार आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.​पदग्रहण सोहळ्यानंतर शहराच्या आगामी विकासकामांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने चांदवड नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा विषय अजेंड्यावर राहिला. ही इमारत आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असावी, यावर आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भर दिला.​उपस्थित मान्यवर व नवनिर्वाचित सदस्यया प्रसंगी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, मोहन शर्मा, बाळासाहेब वाघ, योगेश ढोमसे, डॉ. राजेंद्र दवंडे,नीलेश ढगे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ​ 
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
सत्कारमूर्ती व पदभार स्विकारलेले नगरसेवक -
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 🌳
प्रियंका राऊत, सुधीर कबाडे, मंगल मोरे, भुषन कासलीवाल, मनीषा भालेराव,राजू बागवान, प्रसाद सोनवणे, नयना वाघ, पल्लवी मोरे, संदिप उगले,  डॉ. जीवन देशमुख, राजश्री प्रजापत, राहुल कोतवाल,कमल जाधव, अनिता बडोदे, महेंद्र गांधी, प्रदीप बनकर, सरला अग्रवाल, संभाजी गुंजाळ आणि लीलाबाई कोतवाल यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments