_"खिशाला छिद्र असताना ज्यांनी जगायची जिद्द दिली,
आज खिसा पूर्ण भरलेला आहे, पण जिद्द देणारा माणूसच नाही..."_
आज १ जानेवारी २०२६. काळजाचा तुकडा निखळून पडावा, तसा तो १ जानेवारी २०१६ चा दिवस होता. आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ, स्वाभिमानाचा जिवंत वारसा आणि आमचे सर्वस्व आदरणीय आप्पाजी - कै. बाळासाहेब लहानु सोनवणे (माजी तालुका मास्तर व मुख्याध्यापक) यांना देवाज्ञा होऊन आज १ दशक पूर्ण झाले.
काजीसांगवीच्या मातीत अत्यंत गरिबीत जन्मलेल्या एका मुलाने, ४ भाऊ आणि २ बहिणींच्या मोठ्या कुटुंबात जबाबदारीचे ओझे हसतमुखाने पेलले. संघर्षाच्या ज्वाळा सोसून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि चांदवडच्या शिक्षण क्षेत्रात एक आदराचे स्थान निर्माण केले.
आप्पाजी केवळ २ मुले आणि १ मुलीचे वडील नव्हते; तर आपल्या ५ पुतण्यांना आणि ४ पुतणी यांनासुद्धा त्यांनी पितृप्रेमाची कधीही उणीव भासू दिली नाही. ५ साडूंचा मोठा परिवार असो की नातेवाईक मंडळी, कोणाच्याही कठीण प्रसंगात एखादा डोंगर खंबीरपणे उभा राहावा, तसे आप्पाजी उभे राहायचे. त्यांचा 'निर्भीड बाणा' आणि 'स्वाभिमानी निर्णय' घेण्याची पद्धत हीच आमची खरी मालमत्ता आहे.
_आप्पाजी, तुमच्याविना आयुष्य कसं असतं ते आम्ही गेल्या १० वर्षांपासून अनुभवतोय..._
७ नातवंडांनी घर भरलेलं आहे, सगळी सुखं पायाशी आहेत, पण घरात शिरल्यावर ज्यांच्या शब्दाने हुकूम चालायचा आणि ज्यांच्या नजरेने शिस्त लागायची, तो तुमचा करारी पण प्रेमळ चेहरा कुठेच दिसत नाही. तुम्ही निर्माण केलेली ही पोकळी जगातील कोणतीही गोष्ट भरून काढू शकत नाही.
तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण तुमच्यासारखा 'निर्भीड स्वाभिमान' आणि 'मोठं मन' कुठून आणायचं?
"तुमच्या आठवणींच्या सावलीत आजही आम्ही जगतोय,
तुम्ही दिलेली संस्कारांची शिदोरी डोळ्यात साठवून ठेवतोय..."
तुमच्या पवित्र स्मृतीस, कष्टाळू आयुष्यास आणि त्या महान 'तालुका मास्तरास' आमचे कोटी कोटी प्रणाम!
आप्पाजी, तुम्ही जिथे कुठे असाल, तिथून तुमचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर असाच राहू द्या.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
शोकाकुल:
श्रीमती रत्नमाला बाळासाहेब सोनवणे
सुनिल (आण्णा) बाळासाहेब सोनवणे
संदिप बाळासाहेब सोनवणे
सौ. सविता किरण रसाळ
*समस्त सोनवणे परिवार*
_काजीसांगवी(चांदवड)_
Post a Comment
0 Comments