चांदवड : शिवसेना सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते मा. श्री. भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. शांताराम ठाकरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणत आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकू असे पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना स्पष्ट केले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात चांदवड नगर परिषदेचे नगरसेवक श्री. सुधीर कबाडे (एन.सी.पी – शरद पवार गट), अपक्ष नगरसेवक श्री. राजु बागवान व श्री. प्रदीप बनकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच चांदवड नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. राजाभाऊ अहिरे, लढवय्ये अपक्ष नगरसेवक उमदेवार श्री. देवा पाटील, भाजपचे माजी चांदवड शहर प्रमुख श्री. प्रशांत ठाकरे, नांदुरटेक (ता. चांदवड) गावाचे सरपंच श्री. प्रभाकर ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी श्री. समाधान आवारे, श्री. दीपक पवार, श्री. संदीप पवार, श्री. किरण काळे, श्री. सागर काळे, श्री. रविराज अहिरे, श्री. मयुर बोरस्ते, श्री. रिजवान बागवान, श्री. नावेद बागवान, श्री. सोनु बागवान व श्री. शाहरुख तांबोळी यांनीही शिवसेनेची ध्येयधोरणे स्वीकारत पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शांताराम ठाकरे जिल्हा संघटक व नगरसेवक संदीप उगले तालुका प्रमुख श्री. निलेश ढगे,यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना कुटुंबात स्वागत करत संघटन वाढीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
Post a Comment
0 Comments