चांदवड :- श्री नेमिनाथ जैन विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित विद्यालयाचे तांत्रिक विभागाचे प्रमुख प्रशांत सुताणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे एन.सी.सी. विभाग प्रमुख राजेश चव्हाण त्यांच्या मार्गदर्शनाने कॅडेट कोर ने स्वागत संचालन करत प्रमुख अतिथींचे ध्वजस्तंभाकडे आगमन झाले. या प्रसंगी विद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख संगीता चव्हाण यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीत घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या सूचनेनुसार विद्यालयाचे क्रीडाशिक्षक महेश देवरे यांनी विद्यार्थ्यांसमवेत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत घेण्यात आली. तसेच विद्यालयातील उपशिक्षक दिपक जामदार यांनी व्यसनमुक्तीची शपथ विद्यार्थ्यांसमोर घेण्यात आली. तसेच उपशिक्षिका रेखा शुक्ला यांनी असाक्षर मुक्त गाव ही शपथ घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने उपशिक्षक ज्ञानेश्वर खांदोडे यांनी केले.
सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments