Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचे शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत यश.....

 
सदगुरू रक्षा न्युज चांदवड
चांदवड:  महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या परीक्षेत श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाने यश संपादन केले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
        माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या या इंटरमिजिएट परीक्षेत विद्यालयातील १०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यालयाचा ९८.१६ टक्के निकाल जाहीर झाला असून परीक्षेत अ श्रेणीत अक्षरा हिरे, अपेक्षा ठाकरे, आरव चव्हाण, अरीबा बागवान, अशमार  बागवान, भाग्येश देवरे,  भार्गवी पवार, भावेश शिंदे,भावेश बागुल, देवराज गुरगुडे, हर्षाली बागुल, इंजिला तांबोळी, ईश्वरी थोरमिसे, जानवी वरे, जिज्ञासा बागुल, कावेरी बागुल, केदार मार्कंड, कृतिका शेलार, मनीष गोसावी, पार्थक जाधव, पायल जाधव, पूजा जाधव, राम आहेर, रेणुका कोतवाल, रुचिका भोसले, श्रावणी व्यवहारे, श्रेया हिंगमिरे, सोहम राऊत, स्पर्श  कापडनी, वैष्णवी पवार या विद्यार्थ्यांनी तर ब श्रेणीत तीस विद्यार्थ्यांनी आणि उर्वरित एकोनचाळीस विद्यार्थ्यांनी क श्रेणीत यश संपादित केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांनी मार्गदर्शन केले. 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, उपमुख्याध्यापक देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सहकारी यांनी कौतुक केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments