Type Here to Get Search Results !

दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान........... वाचन संस्कृती टिकविणे काळाची गरज- सदाशिव गांगुर्डे

सदगुरु रक्षा न्युज : कैलास सोनवणे (दिघवद )
चांदवड - श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद,संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात  पत्रकार दिनाच्या निमित्ताने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरातील नामवंत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव गांगुर्डे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ प्रमुख पाहुणे पत्रकार सुनील काळे,दिपक निकम ,दशरथ ठोंबरे,सुनील थोरे,राम बोरसे, सुनिलआण्णा सोनवणे भारत मेचकूल,उत्तमआवरे,कैलास सोनवणे,देविदास जाधव आदी उपस्थित होते. विद्यालयाचे शिक्षक सुनील गांगुर्डे यांनी प्रास्ताविकेतून बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची ओळख करून दिली.शशिकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर पत्रकारांनी प्रकाश टाकून प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.यावेळी पत्रकार सुनील काळे दशरथ ठोंबरे,कैलास सोनवणे आदींनी पत्रकारितेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकारिते करिअर करण्याच्या संधी सांगितल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वर्तमानपत्रांचे महत्त्व प्रतिपादित केले.तसेच शाळेचे शिक्षक किशोर गांगुर्डे यांच्या संकल्पनेतून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारून पत्रकारिते विषयी अधिक माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गांगुर्डे यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी,पर्यवेक्षक इंद्रभान देवरे,अर्जुन गांगुर्डे,संदीप पाटील,प्रभाकर पेंढारी,सुनील चंदनशिव,अमोल ठोंबरे,गणेश गांगुर्डे धनंजय गांगुर्डे,सागर गांगुर्डे,मधुकर गोसावी,साहेबराव घोलप,ओंकार गांगुर्डे,रेणुका कानडे,सुनिता राठोड, हर्षाली भामरे,कलुबाई साबळे,रमा नगराळे, जयश्री पाटील आधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments