सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे (दिघवद )
चांदवडः चांदवड लासलगाव विंचूर प्रकाशा रोडने जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात १९ वर्षीय दुचाकीस्वार उपचारा दरम्यान मयत झाला तर एक जन गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत चांदवड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील बोपाणे येथील आर्यन रविंद्र वाघ (१९) व अमोल साहेबराव गांगुर्डे (२२ रा. गणूर) हे दोघे सोमवार (दि.१३) रोजी दुपारी ३.२० वाजेच्या सुमारास बोपाणे गावाकडे दुचाकीने (एम एच १५, ए झेड ६११९) चांदवडकडून लासलगाव रस्त्याने जात होते. यावेळी कांदयाच्या चाळी जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत आर्यन वाघ व अमोल गांगुर्डे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेत चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. उपचार सुरु असतानाच आर्यनचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अमोल गांगुर्डे हा गंभीर जखमी असून त्यावर प्राथमीक औषधोपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार स्वप्नील जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास चांदवड पोलीस करीत आहे.
Post a Comment
0 Comments