सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः रिपब्लीकन पार्टीऑफ इंडीया (आठवले गट) ची संवाद बैठक आज दि. 12 जानेवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृह चांदवड या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश जी लोढे साहेब यांच्या आदेशाने व मार्गर्शनाखाली चादवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ताराचंद अहिरे यांचे अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे जेष्ठ नेते प्रकाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी चांदवड व देवळा मतदारसंघातील यापुढे येणाऱ्या निवडणुकी संदर्भात विशेष लक्ष देण्यासाठी कार्यकर्त्यांना संबोधन करण्यात आले.
मागील निवडणुकींमध्ये पक्षा च्या आदेशाच्या विरोधात त्याचप्रमाणे पक्षविरोधी कार्यवाही करणाऱ्या पदाधिकारी यांचे संदर्भात चर्चा करण्यात आली . व याच ठिकाणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे तालुका अधक्ष महावीर संकलेचा यांना पद मुक्त करण्याचा व तालुका अध्यक्ष पदावरून काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला, त्याचप्रमाणे रिपब्लीकन पार्टीऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे हे मनमानी पद्धतीने कोणत्याही कार्यकर्त्यांना व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कामकाज करत आहेत या त्यांच्या कामकाजाबद्दल सर्वय आरपीआय कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली यापुढील कामकाज करतांना तसेच पक्षाच्या प्रत्येक मिटिंगमधे हजर राहुन पक्षाच्या आदेशाचे पालन करावे व कार्यकत्याचा विश्वास संपादीत करावा परंतु असे न झाल्यास पुढील बैठकीत योग्य तो निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले
सदर ठिकाणी चांदवड तालुक्याच्या आरपीआय आठवले गटाच्या पक्षाकडुन महावीर संकलेचा यांचे कडुन पद काढुन घेण्यात आलेअसुन त्यांना पदमुक्त करण्याचा ठराव याठिकाणी सर्वानुमते मंजुर करण्यात आला व रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयांच्या तालुका अध्यक्षपदी रविभाऊ जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
रविभाऊ जाधव यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाके फोडुन व पेढेवाटप करून ढोलताशांच्या गजरात कार्यकत्यांनी आनंद साजरा केला
सदर निवडप्रसंगी जिल्हानेते प्रकाश जाधव, विधानसभा अध्यक्ष तारांचद अहिरे,देवळा तालुका अध्यक्ष कैलास पवार, नवनिर्वाचीत तालुका अध्यक्ष रविभाऊ जाधव, शहराध्यक्ष उमेश जाधव, अनिल केदारे, सुनिल अहिरे, प्रमोद जाधव,सुरेश निरभवणे, दिपक जाधव, दिपक साळवे, देवा निरभवणे, शिवाजी धुळे, पांडुरंग भडांगे, अॅड. विकास जाधव, आकाश बनकर, अॅड. शिवाजी धुळे, बाबू हिरे,अनिल आढाव, विकी सुर्यवंशी, सागर गोडबोले, नाना केदारे, किशोर अहिरे, रविभाऊ बनकर, संजय निकाळे, संजय बनकर, हे उपस्थित होते
Post a Comment
0 Comments