Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाचे नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चिञकला स्पर्धेत सुयश....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः नवनीत पब्लिकेशन मुंबई आयोजित ऑल इंडिया नवनीत युवा मास्टरस्ट्रोक चिञकला स्पर्धा देशपातळीवर घेतली जाते. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्था संचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाने या स्पर्धेत यश संपादन केले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या एकुण पाचशे पाच विद्यार्थ्यांनी विविध गटात सहभागी होऊन या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत चौदा विद्यार्थ्यांच्या चिञांची निवड करण्यात आली. इयत्ता पाचवी ते सहावीच्या ब गटातुन ईश्वरी सोपान दिवटे, चैतन्य काशिनाथ अहिरे, प्रणव रुपेश धोंडगे, अनन्या जगदीप शेळके, प्रज्ञा संदीप गुळेच्या, रेहान असलम शहा, अंजिरी जयवंत रहाणे तर इयत्ता सातवी ते दहावी क गटातुन हर्षाली देविदास बागुल, भावेश विजय बागुल, वैष्णवी निलेश पवार, अनुष्का संदीप बोराडे, मधुरा महिंद्र गुजराथी, अर्णव प्रशांत जाधव, पायल किशोर दळवी या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. तर विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, उपमुख्याध्यापक देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या हस्ते स्पर्धेतील या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे म्हणून देण्यात आली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी कौतुक केले.
याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments