चांदवडः श्री नेमिनाथ जैन विद्यालयात स्त्रियांना कर्करोग होऊ नये यासाठी देण्यात येणाऱ्या 9 ते 14 वयोगटातील मुलींना लसीकरणाबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
गर्भाशयाच्या कर्करोग विरुद्ध लसीकरणासाठी रोटरी क्लबचे डॉ.नितीन बकरे, (मुंबई) डॉ.स्मिता तासकर, डॉ.पुष्पा दरेकर,सौ पवार मॅडम, श्री पवार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयामध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी या शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. स्मिता तासकर यांनी कर्करोग विरुद्ध लसीचे महत्व,लसीचे परिणाम, लसीकरणाचे टप्पे, कर्करोग विषयी माहिती स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा कर्करोग या विषयी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले.
तसेच ही लस बाजारामध्ये 4200 रुपयांना मिळत असते परंतु रोटरी क्लब मार्फत ही लस विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही लस घेण्यासाठी पालकांची संमती घेणे आवश्यक असल्याचे देखील स्मिता तासकर सांगितले.
या व्याख्यानाचे आयोजन मनोज जैन यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले होते.या समाजपयोगी उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यालयातील 9 ते 14 वयोगटातील सुमारे 150 मुली उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका मंजुषा ओस्तवाल यांनी केले.
Post a Comment
0 Comments