सदगुरू रक्षा न्यूज : कैलास सोनवणे (दिघवद )
नाशिक वरून मनमाड कडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या गाडीने साडेपाच वाजेच्या दरम्यान तीन हरणांना उडवल्याची घटना घडली आहे या अपघातात तीनही हरणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अपघात स्थळ ज्ञानेश्वर गोजरे गंगाधर गोजरे यांच्या शेताजवळ असल्याने त्यांनी ताबडतोब हरणांना रेल्वेच्या रुळावरून साईटला केले. या घटनेचे सविस्तर वृत्त असे.......
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील घटना नाशिक वरून मनमाड ला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ने हरणाच्या कळपातील तीन हरणांना उडवले त्यामुळे चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु खांडेकर वस्ती येथे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे त्यावेळेस शेतकरी ज्ञानेश्वर गोजरे, आकाश गोजरे ,गंगाधर गोजरे, कैलास गोजरे,यांनी सामाजिक कार्यकर्ते वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांना दिल्याने त्यांनी घटनेचे गार्थीय लक्षात घेता ही माहिती येवला आरएफओ निलेश आखाडे तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक कैलास वाघ व तहसीलदार मंदार कुलकर्णी व रेल्वेचे अधिकारी सय्यद साहेब यांनाही माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या वरिष्ठांनी त्वरीत अंकुश गुंजाळ, भाऊसाहेब झाल्टे व माळी या रेस्क्यू टीम कर्मचाऱ्यांना चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील कांडेकर वस्ती या ठिकाणी पाठवले
Post a Comment
0 Comments