Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात रामानुजन यांना अभिवादन.....

सदगुरू रक्षा न्यूज चांदवड
चांदवड:-भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जयंती निमित्त विद्यालयात साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्र राज जैन यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व या विषयावर उपप्रचार्य यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी कशी निर्माण होईल? याबाबत विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
तसेच विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक अनिल सोनवणे यांनी गणित दिन साजरा करण्या मागचा इतिहास स्पष्ट करून सांगितला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे गणित विभाग प्रमुख गंगाधर खैरनार यांनी केले. तर सूत्रसंचालन तन्वी पवार व श्रावणी गुंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक निलेश निकम व संदिप गुळेचा यांनी केले. तर विद्यालयातील उपशिक्षक हंसराज मोरे यांनी गणितावर आधारित कवितेचे सादरीकरण केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व गणित विषय शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments