Type Here to Get Search Results !

श्रीमती.जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी .........


सदगुरू रक्षा न्युज, चांदवड
चांदवड:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या चांदवड येथील श्रीमती जे.आर गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे होते. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक , गरुड सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 
        कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून  करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे सर यांनी संत गाडगेबाबांविषयी आपले विचार मांडताना सांगितले की ते स्वच्छतेची पुजारी, समाज प्रबोधक, एक सच्चे देशभक्त होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख नितीन ठाकरे सर यांनी  केले.    विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी विविध तक्ते, चित्रे, प्रतिकृती तयार केलेले करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Post a Comment

0 Comments