चांदवड - कांदा दरात मागील दोन तीन दिवसात १५०० ते २००० रुपयांपर्यंत घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.मागील काळात उत्पादन खर्चात झालेली वाढ तसेच अवकाळी पाऊसाने कांद्याच्या उत्पादन खर्चात मोठी घट झाल्याने सध्याचे कांदा दर व उत्पादन खर्च यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे अश्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा दरात वाढ व्हावी यासाठी निर्यात शुल्क २० टक्क्यां वरून शून्य टक्के करावे ही आग्रही मागणी आमदार डॉ राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे नागपूर येथील अधिवेशनात केली.
नाशिक जिल्ह्यासह चांदवड-देवळा मतदार संघामध्ये कांदा हे प्रमुख उत्पादक पिक घेतले जाते. मतदार संघातील बहुसंख्य शेतक-यांचे कांदा हे प्रमुख पिक आहे. कांद्याचा भाव स्थिर राहण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. जसे की किमान निर्यात शुल्क आकारणी करणे (MEP), नाफेडकडून खरेदी करणे आदी उपाययोजना राबवून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्यात समतोल राखला जातो. परंतु सद्यस्थितीत खरीब हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले आहे. त्यात अचानकपणे सरासरी १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल भाव कोसळला असून कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात येऊन ते शुन्य टक्के करण्यात यावे अशी आग्रही मागणी आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनात निवेदनाद्वारे आमदार डॉ राहुल आहेर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Post a Comment
0 Comments