चांदवड- श्री. छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयातील स्काऊट आणि गाईडचे दोन दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दहिवद या ठिकाणी करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि आदर्श नागरिकत्वाची नीतिमूल्य रुजावीत यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी शाळेकडून या श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री.नवनाथ वाकचौरे मुख्य जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट नाशिक यांचे हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बंधुप्रेम आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी स्काऊट महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वावलंबन,परोपकार,संघ भावना,एकात्मता तसेच प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये या शिबिराच्या माध्यमातून रुजली जाते असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर शेकोटीच्या कार्यक्रमाचे प्रज्वलन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश भाऊ निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.शेकोटी कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्यातील विविध कलागुणांना वाव दिला.ह्या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात जीभाऊ शिंदे संचालक नासिक सोसायटी,ज्ञानेश्वर ठाकरे संचालक नासिक सोसायटी,पोलीस पाटील रमेश निंबाळकर संस्थेचे चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे,उपाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे,शिक्षक संचालक सदाशिव गांगुर्डे,संचालक नानासाहेब गांगुर्डे,बनुबाई गागरे तसेच जगन निंबाळकर,संदीप वाघमोडे, राजेंद्र पाटील,यशवंते,संजय खांदे,संजय निंबाळकर उपस्थित होते. जिभाऊ शिंदे यांनी स्काऊट चे महत्त्व आपल्या मनोगतातून पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव गांगुर्डे यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार किशोर गांगुर्डे यांनी मानले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी,पर्यवेक्षक इंद्रभान देवरे,शिबिर प्रमुख सुनील गांगुर्डे,तसेच अर्जुन गांगुर्डे,प्रभाकर पेंढारी, अमोल ठोंबरे,संदीप पाटील, गणेश गांगुर्डे,सुनील चंदनशिव,मधुकर गोसावी, सागर गांगुर्डे,धनंजय गांगुर्डे, शुभम हांडगे,रेणुका कानडे कलुबाई साबळे,सुनिता राठोड,हर्षाली भामरे,रमा नगराळे ,जयश्री पाटील साहेबराव घोलप,ओंकार गांगुर्डे आदींनी प्रयत्न केले.
Post a Comment
0 Comments