Type Here to Get Search Results !

चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे शिरीष कुमार कोतवाल यांच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ


सद्गुरू रक्षा न्युज / सुनिल आण्णा सोनवणे

चांदवड - चांदवड देवळा मतदारसंघात मागील दहा वर्षांपासून सत्ताभोगणारे दोघे आहेर भाऊ पैकी एक भाऊ आज निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच सांगतोय की मतदारसंघात विकासकामे झाली नाहीत मग दहा वर्ष झोपलें होते का...? तसेच देवळा मतदारसंघातील गुंडगिरी संपवायची असून वाळू,मुरूम व खडी कोन्हाची मक्तेदारी चालते हे सर्व जनता जनार्दन जाणून असून सर्व जनतेला दोघा भावांचा डाव कळला असून आत्ता निवडणूकीत मतदार दोघा भावांना जागा दाखवल्या शिवाय रहाणार नाही अश्या शब्दात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
     महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार कोतवाल यांचा प्रचाराचा श्रीगणेशा आज बुधवार दि ६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आली. यावेळी खासदार भास्कर भगरे,खासदार शोभा बच्छाव,महाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्ष
शरद आहेर,कादवाचे चेअरमन श्रीराम शेठे,मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे
राष्ट्रवादीचे गोकुळ पिंगळे,गजानन शेलार,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष,डॉ सयाजीराव गायकवाड,काँग्रेसचे संपतराव वक्ते,देवळ्याचे डॉ विश्वास निकम
खंडेराव आहेर,सुनील देवरे उमराणे,बाळासाहेब पिंगळे आदींसह मतदारसंघातील मविआ चे पदाअधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलताना कोतवाल म्हणाले की पक्षाने अन्याय केला म्हणत पक्ष सोडून गेले मात्र त्यांनी स्वताचे आत्मपरीक्षण करावे की त्यांनी पक्षासाठी काय केले असे म्हणत त्यांनी काँग्रेस सोडून गेलेले संजय जाधव यांच्यावर टीका केली.यावेळी खासदार भास्कर भगरे,खासदार शोभा बच्छाव,महाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्ष
शरद आहेर,कादवाचे चेअरमन श्रीराम शेठे,मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे
राष्ट्रवादीचे गोकुळ पिंगळे,गजानन शेलार,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष,डॉ सयाजीराव गायकवाड,काँग्रेसचे संपतराव वक्ते आदींनी भाषणे केलीत याप्रसंगी त्यानी मविआ उमेदवार श्री कोतवाल यांना निवडून देण्याची आव्हान केले.यावेळी चांदवड देवळा मतदारसंघातील असंख्य कार्येकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments