Type Here to Get Search Results !

उपनगराध्यक्ष सौ.कविता उगले यांनी दिले गणेशोत्सवासाठी उपकार्यकारी अभियंता विदयुत विभाग यांना शहरातील लोंबकळणाऱ्या तारांसबंधी निवेदन

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः शहरातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना प्रेशर लावणे व बंच्छ केबल टाकणे यासाठी खबरदारी घेण्यासाठी उपनगराध्यक्ष सौ .कविता उगले यांनी निवेदन दिले चांदवड शहरांमध्ये गणेश उत्सव चालू होत असून चांदवड शहरांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मोठ्या स्वरूपात मिरवणुका निघत असतात मिरवणुकीमध्ये मोठया गणेशमूर्तीच्या मिरवणुका निघतात. कार्यकर्ते ढोल ताशाच्या गजरात आनंदात नाचत असतात त्यांच्या हातात मोठे मोठे भगवे झेंडे राहतात व ते झेंडे मिरवणुकीमध्ये फिरवत असतात त्यामुळे आपल्या पोलवरील बऱ्याच ठिकाणी आपल्या मेन लाईनच्या विद्युत  तारांना प्रेसर तुटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तारा लोंबकळत आहे त्यामुळे मिरवणुक काळात मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होऊ शकते त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी तारा लोंबकळत आहे त्या त्या ठिकाणी तातडीने प्रेसर किवा काही महत्त्वाच्या ठिकाणी बंच केबल टाकणे गरजेचे आहे व लेंडी हट्टी येथील डीपी व्यवस्थित फिटिंग झालेली नसल्याने तेथेही दुर्घटना घडू शकते त्यामुळे  या अत्यंत महत्त्वाच्या कामाकडे लक्ष देऊन हे सर्व काम गणेश विसर्जनाच्या पूर्वी मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे तसेच गणेश उत्सव काळात शहरातील वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी विद्युत मंडळाचे सर्व कर्मचारी मिरवणूक मार्गात सहभागी व्हावे अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

Post a Comment

0 Comments