दैनिक आवाज : सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवडः* महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट रेखाकला परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या परीक्षेत श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या या परीक्षेत श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९९.०५ टक्के लागला असून यात अ श्रेणीत २१, ब श्रेणीत ५८, क श्रेणीत १३० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९९.४३ टक्के लागला असून यात अ श्रेणीत २३, ब श्रेणीत ४८, क श्रेणीत १०४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक काशीनाथ अहिरे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, मानद सचिव जवाहरलाल आबड, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, उपमुख्याध्यापक संदीप समदडिया, पर्यवेक्षक रविंद्र पवार आदी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सहकारी यांनी अभिनंदन केले.आदी सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
Post a Comment
0 Comments