सदगुरू रक्षा न्युज : सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड :* येथील नॅक मानांकित अ+ श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व.सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयास देशातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेला ‘स्वायत्त' दर्जा अर्थात 'ऑटोनॉमस दर्जा' प्राप्त झाला आहे. हा दर्जा शै. वर्ष २०२४-२०२५ पासून ते शै. वर्ष २०३३-२०३४ अशा एकूण दहा वर्षांसाठी असणार आहे. युजीसी (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून तसे पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे.अलीकडेच ‘नॅक’च्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ४ पैकी ३.२६ सीजीपीए सह 'ए प्लस' ही ग्रेड दिलेली होती. या स्वायत्ततेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या उच्च शैक्षणिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड यांनी सांगितले की, महाविद्यालयास स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः तयार करता येईल.परीक्षेचे नाविन्य पूर्ण पद्धतीने नियोजन करणे, परीक्षांचा निकाल लावणे या सर्वांचे महाविद्यालयाला स्वातंत्र्य असेल. स्वायत्तता मिळाल्यामुळे महाविद्यालयाला नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे अधिक सुलभ होणार आहे.
विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण, व्यवसायाभिमुख व नोकरी पूरक प्रशिक्षण देणे शक्य होईल.राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना वाव देणे शक्य होईल.
प्रा. भावना खिवंसरा यांनी समन्वयक म्हणून काम केले. या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा ,योगेश मोदी आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व प्रबंध समितीचे सदस्य आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहे.तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, उपप्राचार्य डॉ.एम. आर. संघवी, डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्वांचे अभिनंदन केले. या दर्जामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक वर्गात देखील आनंद, उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
शतक पूर्ततेकडे वाटचाल करीत असलेल्या संस्थेच्या इतिहासात इंजीनियरिंग कॉलेजला मिळालेला ऑटोनॉमस दर्जा एक मैलाचा दगड ठरणार आहे. या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण घेण्यास मोठी मदत मिळणार आहे.
दिनेशकुमार लोढा,
उपाध्यक्ष , विश्वस्त समिती , श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम, चांदवड
Post a Comment
0 Comments