कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील मध्यवर्ती भागातून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.त्यात विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन जय भवानी-जय शिवाजी अशा घोषणा देत परीसर दुमदुमून टाकला. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ,बाल शिवाजी, छत्रपतींचे मावळे, भालदार- चोपदार,कलश व तुळसी वृंदावन घेतलेल्या सुवासिनी यांची आकर्षक वेशभूषा धारण करून मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोलताशांच्या गजरात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांबरोबरच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चांदवड तालुका संचालक आदरणीय डॉ. सयाजीराव गायकवाड साहेब,सेवक संचालक श्री जगन्नाथजी निंबाळकर साहेब,श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय लोहकरे सर, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष श्री खंडेरावजी आहेर, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष श्री सुभाषदादा कोतवाल,पर्यवेक्षक श्री प्रकाश आहेर सर, शिवव्याख्याते प्राध्यापक जावेद सलीम शेख,अभिनव बालविकासचे मुख्याध्यापक ,उच्च माध्यमिक, माध्यमिक व अभिनव बालविकास शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ यांनी ही मोठ्या उत्साहात शोभायात्रेत सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी शहरातील मध्यवर्ती भागात,चौका-चौकात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रायरेश्वर मंदिरातील स्वराज्याची शपथ हे पथनाट्य सादर केले.तसेच शहरातील विविध भागात सुवासिनींनी माता जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज व पालखीचे औक्षण केले.त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित चांदवड तालुका संचालक डॉ सयाजीराव गायकवाड साहेब व सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. विद्यालयाच्या गीत मंचाने महाराष्ट्र गीताचे गायन केले. महाविद्यालयातील विद्यार्थी सार्थक जगदाळे याने शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यालयात प्राध्यापक जावेद सलीम शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिवरायांच्या जीवनातील थरारक प्रसंग आपल्या पहाडी आवाजात त्यांनी सादर केले.जो खेळतो जिवाशी तो शिवाजी असे शिवाजी महाराजांचे चरित्र होते, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आजच्या तरुणांनी आपले जीवन जगले पाहिजे, महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची भूमी आहे हा इतिहास, हा वारसा आपण जपला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती नांदे प्रिया व श्री गायकवाड रमण सर यांनी केले तर आभार श्री काळे ज्ञानेश्वर यांनी मानले.शिवजयंतीच्या सोहळ्यास उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच अभिनव बालविकास मंदिरचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, ग्रामस्थ , सर्व प्राध्यापक ,शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments