Type Here to Get Search Results !

सरदार राजोळे यांचे वंशज मराठा रामनारायणजी राजोळे पानिपत यांची चांदवड येथे सदिच्छा भेट...

सरदार राजोळे यांचे वंशज मराठा रामनारायणजी राजोळे पानिपत यांची चांदवड येथे सदिच्छा भेट... 

 *चांदवड* : पानिपत हरियाणा येथून आलेले मराठा सरदार राजोळे यांचे वंशज मराठा रामनारायणजी राजोळे पानिपत यांनी चांदवड येथे सदिच्छा भेट दिली असता चांदवड दुर्ग भ्रमंती मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. 
          मराठ्यांनी पानिपत युद्धात मोठे शौर्य गाजवले. शौर्यदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातन मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी यावे यासाठी आमंत्रण देण्यासाठी व मराठा सरदार मल्हारराव होळकर यांच्या पदस्पर्शाने व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ( होळकरवाडा ) रंगमहाल बघण्यासाठी त्यांचे चांदवड येथे आगमन झाले. याप्रसंगी त्यांच्यासोबत ईश्वरसिंग राजोळे ,  जोगिंदर सिंग राजे , सरदार भाऊसाहेब राजोळे , आदी वंशज त्यांच्यासोबत होते. 
        रंगमहाल ( होळकरवाडा ) बघून सध्या असलेली अवस्था... वाड्याची वाताहत... पाहून त्यांचे मन हेलावले... ही आपली विरासत आपण जोपासली पाहिजे मल्हार होळकरांचा पराक्रम आणि पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांची साथ आपल्या डोळ्यांनी बघण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


Post a Comment

0 Comments