चांदवडः मराठा विद्या प्रसारक समाज संचलित डॉ. ना.का. गायकवाड विद्यालय उसवाड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष केदु पाटील बच्छाव होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ सभासद अशोक दादा गायकवाड, भिलू पाटील आहेर, देवाजी गायकवाड, देवमन पवार,माधव पवार,घमाजी शिंदे,किरण पवार,समाधान पवार,वामन पवार ,दादा बिडगर,कौतिक पवार, चंद्रकला बिडगर, प्रतिभा पवार,मनिषा गायकवाड, अरुणा आंबेकर, देश सेवेसाठी नवनियुक्त BSF जवान कुणाल गायकवाड, CRPF जवान ऋषिकेश गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बस्ते सर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत मोरे,पर्यवेक्षक अरुण व्हडगर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय उसवाड या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले .याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घर घर तिरंगा, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला .प्रथमतः विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत मोरे यांनी प्रास्ताविकातून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात दादा बिडगर व चंद्रकला बिडगर यांच्या शुभहस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले व राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजपूजन जेष्ठ सभासद वामन पवार यांनी केले.राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण कुणाल गायकवाड यांनी केले. त्यानंतर शालेय गीत मंचाने राष्ट्रगीत ,ध्वजगीत ,राज्यगीत गायनातून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .याप्रसंगी स्काऊट गाईड ध्वजाचे देखील ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वज पूजन समाधान पवार व प्रतिभा पवार यांनी केले व ध्वजाचे ध्वजारोहण ऋषिकेश गायकवाड यांनी केले .त्यानंतर शालेय गीतमंचाने झंडा गीत सादर केली. या प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच कॉपीमुक्त अभियानांतर्गत कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देखील घेण्यात आली .तसेच असाक्षर गाव ,कुष्ठरोग निर्मूलन याविषयी शपथ घेण्यात आली. त्यानंतर शालेय विद्यार्थी स्काऊट गाईड पथकाने संचलन सादर केले. त्यानंतर यश पवार या विद्यार्थ्यांने प्रजासत्ताक दिनावर आधारित भाषण केले.याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली. तसेच विद्यार्थिनींनी लेझीम नृत्याचे सादरीकरण केले.प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदनही केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक समिती प्रमुख ज्येष्ठ शिक्षक रघुनाथ सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक संजय गांगुर्डे यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले .कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक ,आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, विविध विकास कार्यकारिणी सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य, शालेय समितीचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,देशप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments