Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे श्री चंद्रेश्वरबाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा संपन्न..

सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी चांदवड
चांदवडः चंद्रेश्वरगडाचे महंत स्वामी बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व श्री चंद्रेश्वर महादेव मंदिराचे व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनात व स्वामी गणेशपुरी महाराज ( देवदारेश्वर ) स्वामी नागराजपुरी महाराज ( नाशिक ) स्वामी प्रमोदपुरी महाराज, स्वामी महेशपुरी महाराज, स्वामी खटवांगपुरी महाराज या संत महंतांच्या उपस्थितीत संयुक्त पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.
 चांदवड येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्वामी दयानंद महाराज व द्वितीय चंद्रेश्वरबाबा स्वामी विद्यानंद महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळा सालाबादप्रमाणे यंदाही भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.पुण्यतिथी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला चंद्रेश्वरगडावर वैराग्यमुर्ती ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे ( रूई आश्रम ) यांचे सुश्राव्य जाहीर किर्तन झाले. सकाळी - ०६ वाजता श्री चंद्रेश्वर महादेव भगवान अभिषेक ७ वाजता श्री चंद्रेश्वर बाबा यांच्या दोन्ही समाधींचे पुजन ०८ वाजता श्री चंद्रेश्वर बाबा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे झाली. ८.३० वाजता श्री सप्तॠषी समाधी पुजन करण्यात आले. व ११ वाजता महाप्रसाद व भंडारा आयोजित करण्यात आला. 
या सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी सहभाग नोंदविला. श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments