सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे सालाबाद प्रमाणे... महंत गंगापुरीजी , महंत प्रभातपुरीजी व तृतीय चंद्रेश्वरबाबा महंत स्वामी बन्सीपूरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली....
प्रथम चंद्रेश्वरबाबा स्वामी दयानंदजी महाराज व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी रात्री - ०९ ते ११ वा. ह.भ.प.प्रभाकर नाना झोलकर , परभणीकर यांचे जाहिर किर्तन होईल.
बुधवार दिनांक - १५ जानेवारी रोजी
१) सकाळी - ०६ वा. श्री चंद्रेश्वर महादेव भगवान चां अभिषेक
२) सकाळी - ०७ वा. श्री चंद्रेश्वरबाबांच्या दोन्ही समाधींचे पुजन होईल.
३) सकाळी - ०८ वा श्री चंद्रेश्वरबाबांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे होईल.
४) सकाळी - ८.३० वा. श्री सप्तॠषी समाधी पुजन होईल.
५) सकाळी - ११ वा. महाप्रसाद व भंडारा होईल.
या कार्यक्रमात पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळे व संत महंत उपस्थित राहतील. तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रेश्वरगडाचे महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज व श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराचे वतीने केले आहे.
Post a Comment
0 Comments