निमगव्हाण येथे दंत चिकित्सा शिबिर संपन्न
January 12, 2025
0
चांदवड : तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते डॉ. वैभव विठ्ठल साठे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दातांची तपासणी करून औषधोपचार केले व मार्गदर्शन केले तसेच आरोग्याच्या चांगल्या सवयी विषयी मार्गदर्शन केले तसेच डॉ जगदाळे ,निरंजन शिंदे ,प्रतीक वडनेरे यांनी तपासणीसाठी सहकार्य केले कार्यक्रमासाठी सरपंच छायाताई गोधडे ,उपसरपंच नागेश ठोंबरे ,कैलास पवार , दिगंबर दरेकर ,दत्तात्रय दरेकर ,शांताराम गायकवाड ,शरद गोधडे ,सोनीताई शिंदे , सरला पवार संजय जाधव,अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होते ,या वेळी आलेल्या पाहुण्याचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शांताराम हांडगे यांनी केले सूत्रसंचालन व आभार श्रीमती वृषाली जाधव यांनी केले
Tags
Post a Comment
0 Comments