सदगुरु रक्षा न्युज चांदवड
चांदवडः आमदार डॉ राहुल दादा आहेर , व मा. जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नाशिक जिल्हा ग्रामीण ( उत्तर ) संघटनात्मक बांधणी केली जात असून राज्यात ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी भूषण कासलीवाल ( जिल्हा सरचिटणीस ) , संतोष भाऊ पलोड ( चांदवड निवडणूक प्रभारी ) , मनोज शिंदे ( तालुकाध्यक्ष ) , मोहन शर्मा ( जिल्हा उपाध्यक्ष ) , बाळासाहेब वाघ ( जेष्ठ नेते ) , बाळासाहेब कासलीवाल ( नांदगाव निवडणूक प्रभारी ) , सुरेश दादा जाधव ( जेष्ठ नेते ) , माणिक थोरे , अरूण बिरारी , मंजूरभाई मुलाणी , कौसर घासी , संजय क्षत्रिय ( शहर उपाध्यक्ष ) , संजय चौबे , किशोर क्षत्रिय , विशाल ललवाणी , सोनु आप्पा पवार , व्ही. बी. चव्हाण तात्या , संतोष ढोमसे , महेश खंदारे ( व्यापारी आघाडी ) , संकेत वानखेडे , संजय पाडवी ( जिल्हाध्यक्ष आदिवासी मोर्चा ) वर्धमान पांडे , आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रविवार , दिनांक - ५ जानेवारी २०२५ रोजी यानिमित्ताने राज्यात सदस्य नोंदणी अभियान उत्सव साजरा केला जाणार आहे. या सदस्य नोंदणी अभियान उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा. संतोष भाऊ पलोड ( चांदवड विधानसभा निवडणूक प्रभारी ) यांनी व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments