Type Here to Get Search Results !

चांदवड होळकर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

सदगुरू रक्षा न्यूज : सुनिलआण्णा सोनवणे
चांदवडः आज दि. 20 डिसेंबर रोजी चांदवड येथील महाराणी उषाराजे होळकर  विद्यालयात विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. राहुलदादा शिरीषकुमार कोतवाल यांचे शुभहस्ते प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य जाधव ए. बी. यांनी प्रास्तविक केले. श्रीमती निकम एस. पी. व श्री. देशमुख टी. आर.यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले.
सदर कार्यकम प्रसंगी संस्थेचे सचिव बारगळ डी. आर. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ कोतवाल व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्राचार्य जाधव ए. बी. उप प्राचार्य जाधव के. टी. देशमुख सर, शिंदे सर, ठाकरे सर, गांगुर्डे सर, निकम मॅडम, पवार मॅडम, गुंजाळ मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पाटील एस. एन. व श्रीमती शिरसाठ मॅडम तसेच शेवाळे मॅडम, आहेर मॅडम, गावित सर, अहिरे सर, विधाते सर.जुनिअर कॉलेजचे निकम सर, शिंदे जीवन सर, कऱ्हे सर, शिंदे डि. एच, कापडणीस सर, जाधव सर, गांगुर्डे सर, केदारे मॅडम, कोतवाल मॅडम, जाधव मॅडम, ठाकरे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments