चांदवड:-पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेड नाशिक तर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेतली जाते. यावर्षीचा या चित्रकला स्पर्धेचा बारा बलुतेदार हा विषय होता. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्था संचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाने या स्पर्धेत यश संपादन केले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. विद्यालयातील पाचवी ते सातवी या गटातून
चैतन्य काशिनाथ अहिरे, सारा बिलाल तांबोळी, साईराज योगेश छाजेड, इयत्ता आठवी ते बारावी यातून वैष्णवी पांडुरंग ठाकरे, ऋषिकेश हरिभाऊ ठाकरे, गौरव रघुनाथ ठाकरे, वैष्णवी निलेश पवार, स्नेहल सचिन खैरनार, मनीष राकेश गोसावी, स्नेहल कैलास निकम, समृद्धी सुनील देवतवाल, ओम भास्कर गांगुर्डे, श्रद्धा शाम वाघ, जयेश राकेश गोसावी या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, उपमुख्याध्यापक देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे म्हणून देण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी कौतुक केले.
याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments